सायबर फसवणूक टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी कायम सावध राहावे -आजगावकर

दि कल्याण जनता सहकारी (मल्टीस्टेट शेड्युल्ड )बँकेच्या वतीने सहकार सप्ताहा निमित्त सायबर गुन्ह्यापासून संरक्षण या जनजागृती पर माहितीपूर्ण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पोलीस निरीक्षक सुदेश वसंत अजगावकर, सायबर पोलीस स्टेशन ठाणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. बँकेच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. संपदा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक अनंत कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. आजगावकर यांनी त्यांना अनुभवास आलेली अनेक उदाहरणे देऊन ज्येष्ठ नागरिकांनी काय काय करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले.
सायबर सिक्युरिटी बाबत बँकेची भूमिका व तयारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मांडली. बँकेचे उपाध्यक्ष महेश देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कल्याण येथील ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रश्नोत्तरे देखील झाली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे नियोजन उपमहाव्यवस्थापक सुनील भोईर व सरव्यवस्थापक मिलिंद फाटक यांनी केले. सूत्रसंचालन दिव्या दरेकर यांनी केले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *