पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा – महामंत्री विवेक जुगादे

0 Comments

पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा – महामंत्री विवेक जुगादे

सहकार भारतीतर्फे सहकार प्रशिक्षण व स्नेहमेळावा यशस्वी

चंद्रपूर –  सहकार हे सेवाक्षेत्र आहे.सहकाराची उंची वाढविण्यासाठी या क्षेत्रात प्रामाणिकपणा व समर्पित वृत्तीची गरज आहे. पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी स्पर्धेच्या मोहात न पडता विश्‍वस्ताच्या भूमिकेतून काम करावे, असे सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे सांगितले.

प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेत सहकार भारती चंद्रपूर तर्फे आयोजित जिल्हास्तरीय सहकार प्रशिक्षण व स्नेहमीलन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव विनोद भीमनवार हे होते. ते म्हणाले, संस्काराशिवाय सहकाराचे पावित्र्य राखले जाऊ शकत नाही. त्यामुळे सहकार  क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षणातून संस्कारीत करण्याचे कार्य दीर्घकाळापासून सहकार भारती करीत आहे. सभासद व ग्राहकाप्रतीचा विश्‍वास निर्माण करण्यासाठी पतसंस्थांनी संस्कारीत होऊन प्रामाणिकपणे उत्तमोत्तम कार्य करावे.

विभाग सहप्रमुख विजय गोटे, जेष्ठ मार्गदर्शक महेश मासुरकर, प्रतिकार संस्थेचे अध्यक्ष माणिकराव पाटेवार यांचीही समायोचित भाषणे झाली. जिल्ह्यातील पतसंस्स्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांचा प्रशिक्षणाचा वर्ग घेण्यात आला. डी. एन. काकडे  यांनी ‘पतसंस्था व्यवस्थापन व सक्तीची कर्जवसुली’ यावर तर स्वाती कुलकर्णी यांनी ‘सहकारी पतसंस्था व आयकर कायदा’ यावरील नियम व कायदे समजावून सांगितले. माजी सभापती चंदू मारगोनवार, जिल्हा महामंत्री पुष्पा गोटे, भाग्यश्री नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर महालक्ष्मे, राजेश कावलकर, प्रगती माढई यांच्यासह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक सहकार भारती जिल्हाध्यक्ष सतीश वासमवार यांनी तर सूत्र संचालन सुरज बोम्मावार आणि आभार किशोर आनंदवार यांनी मानले. जिल्ह्यातील दि महाराष्ट्र अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी, जयकिसान नागरी सहकारी पतसंस्था, प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्था, उत्कर्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, प्रवीणभाऊ नागरी सहकारी पतसंस्था, प्राथमिक शिक्षक पतपुरवठा सहकारी संस्था, जि.प.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, कल्पतरू बिगरशेती सहकारी पतसंस्था, कल्पवृक्ष महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, विदर्भ महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी, कांतीज्योती नागरी सहकारी पतसंस्था, श्री साई नागरी सहकारी पतसंस्था, संताजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, आनंद शालेय माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्था सहभागी झाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण…