Blog

  • पुनर्विकास करताना कायद्यांचे पालन करत सभासदांचे हित जपले जावे – रणजित नाईकनवरे

    पुणे, दि. ७ – पुनर्विकास करताना आवश्यक सर्व कायद्यांचे पालन करत सभासदांचे हित जपले जाईल आणि त्याचबरोबर शहराचे सौंदर्यही अबाधित राहील याची काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा क्रेडाई इंडियाचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी आज येथे व्यक्त केली. शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी गृहहार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर्स फेडरेशन (GRSF) आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (MNLU) यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्विकासावरील दोन दिवसीय विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिबिर पुण्यात नुकतेच आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन उपस्थित होते.
    महासेवा आणि विकसित कन्सल्टिंग यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यामध्ये आर्किटेक्ट्स, अनुभवी बांधकाम व्यावसायिक, नवोदित डेव्हलपर्स, कंत्राटदार, विधी तज्ज्ञ, इंजिनिअर्स, सनदी लेखापाल तसेच विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य यांचा समावेश होता. याप्रसंगी पुनर्विकास प्रक्रियेवर आधारित एका विशेष अभ्यासपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. नाईकनवरे यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील आपले अनुभव सांगतानाच GRSF च्या स्थापनेमागील उद्दिष्टे आणि भविष्यातील ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला तर सुहास पटवर्धन यांनी पुणे शहरातील पुनर्विकासाचे सद्यस्थितीतील स्वरूप आणि या क्षेत्रापुढील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. महासेवाचे अध्यक्ष सीए रमेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली हा दोन दिवसीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. यामध्ये पुनर्विकासाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
    ॲड. धीरज जगदाळे आणि ॲड. गीता चौधरी यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी आवश्यक असणारी कायदेशीर चौकट आणि पुनर्विकासाची टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया समजावून सांगितली. आर्किटेक्ट सिराज शेख यांनी युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल नियमावली आणि स्वयं-पुनर्विकास या संकल्पनेवर तांत्रिक विश्लेषण सादर केले. मंत्रा ग्रुपचे सारांश डे आणि सीए सचिन शर्मा यांनी विकासकाची निवड करताना घ्यावयाची काळजी आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली. सीए ऋषिकेश कोठावळे यांनी पुनर्विकासातील प्राप्तिकर आणि जीएसटी संदर्भातील तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. ॲड. महेश गजेंद्रगडकर यांनी पुनर्विकासातील तक्रार निवारण आणि कायदेशीर दाद मागण्याच्या पद्धतींवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण संचालक विजय सावदेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले हो

  • सहकारी बँकांनी विश्‍वासार्हतेबरोबरच बँकिंग साक्षरता वाढवण्याची गरज – सतीश मराठे

    पुणे, दि. 24 – दैनंदिन व्यवहारात नागरी सहकारी बँकांनी बदलत्या काळानुसार सर्वंकष बदल करणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात गुंतवणूकदारांबरोबरच कर्जदार देखील चिकित्सक झाला आहे, त्यामुळे विश्‍वासार्हता जपण्याबरोबरच बँकिंग साक्षरता वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे व्यक्त केले.
    सहकार सुगंध आयोजित “बदलते बँकिंग” या परिसंवादात ते बोलत होते. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर लिखित “बँकिंग साक्षरता” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्यानिमित्ताने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, बुलडाणा क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, नॅफकबचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि पुस्तकाचे लेखक गणेश निमकर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दृकश्राव्य माध्यमातून यावेळी शुभेच्छा दिल्या.
    परिसंवादात बोलतांना मराठे पुढे म्हणाले की, सध्याच्या स्थितीमध्ये देशातील किमान 50 टक्के जनता बँकिंग क्षेत्रापासून दूर आहे. त्याचबरोबर आर्थिक साक्षरता वाढावण्याची गरज आहे. एकीकडे गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे, कर्ज व्यवहार देखील वाढत आहेत, तर दुसरीकडे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत. या बदलत्या बँकिंगच्या दृष्टीने ग्राहकांमध्ये बँकिंग साक्षरता होणे आवश्यक असून त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे.