मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ….ओसंडून वाहणारा उत्साह व डोळ्यांचे पारणे फेडणारा समारोह..

0 Comments

मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ

सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, भारतीय रिझर्व बँकेचे संचालक व असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत मा श्री सतीशजी मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुंबई (दादर) येथील श्री स्वामीनारायण सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मा श्री भैय्याजी जोशी, माजी केंद्रीय मंत्री व देशाच्या नवीन सहकार धोरण समितीचे अध्यक्ष मा श्री सुरेशजी प्रभू, इफकोचे अध्यक्ष मा डॉ उदय शंकर अवस्थी, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा डॉ उदयजी जोशी, राष्ट्रीय महामंत्री मा श्री दीपकजी चौरसिया, मा सतीशजींच्या सुविद्य पत्नी सौ भारतीताई मराठे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री दत्तारामजी चाळके, प्रदेश महामंत्री श्री विवेक जुगादे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून सतीशजींच्या कार्याचा गौरव केला. सर्वच वक्ते सतीशजींबद्दल भरभरून बोलले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. सहकार भारतीचे कार्य शून्यातून कसे निर्माण झाले, याची प्रचिती अनेक मान्यवरांच्या उद्बोधनातून आली. सतीशजींनी आपल्या मनोगतातून अनेक प्रेरणादायी अनुभव कथन केले. येणार्‍या काळात कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून संघटनेचे काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचालन सहकार भारती राष्ट्रीय महिला प्रमुख सौ रेवतीताई शेंदुर्णीकर यांनी केले. सहकार सुगंधचे संपादक श्री भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित अतिशय देखण्या अशा श्री सतीशजी मराठे गौरव विशेषांकाचे विमोचन सुद्धा याप्रसंगी मोठ्या थाटात करण्यात आले.
कार्यक्रमाला सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री मा श्री संजयजी पाचपोर, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा श्री मंगलप्रसाद लोढा, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष व NAFCUBचे उपाध्यक्ष मा श्री मिलिंद काळे, NAFCUBचे माजी अध्यक्ष मा श्री ज्योतींद्रभाई मेहता, महाराष्ट्र को-ऑप बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष मा श्री अजय ब्रम्हेचा, महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक असोसिएशनचे अध्यक्ष मा श्री भाऊ कड, TJSB बँकेचे अध्यक्ष मा श्री शरद गांगल, मा श्री सुभाष जोशी, मा श्री प्रकाशजी पाठक, मा श्री विलास देसाई यांच्यासह अनेक बँकांचे अध्यक्ष, संचालक व संपूर्ण देशभरातून सहकार क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts