सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा…..

0 Comments

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन

नाशिक – सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा तसेच नाशिक जिल्हा रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सलग 20 वर्षे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांचे नुकतेच निधन झाले.

येथील रेणुकानगर पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आणि रेणुकानगर गृहनिर्माण संस्थेच्या अध्वर्यू म्हणून त्यांना ओळखले जाते. नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या प्रदीर्घ काळ संचालक व अध्यक्ष होत्या.सहकार, दिव्यांग विद्यार्थी, महिला, अनाथ मुले अशा विविध क्षेत्रातील त्यांचे काम वाखणण्याजोगे आहे. सहकार भारती प्रदेशच्या आळंदी येथील अधिवेशनात प्रदेश अध्यक्षपदी डॉ. शशिताई अहिरे यांची निवड झाली होती.त्यांचे सुपुत्र नरेश हे बांधकाम व्यावसायिक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर व्यवस्था प्रमुख आहेत. हरसूल येथील विश्‍व हिंदू परिषदेचे जनजाती कन्या छात्रालय प्रारंभ होण्यापूर्वी साप्ताहिक आरोग्य केंद्र सुरू होते. मेरी कॉलनीत त्या वैद्यकीय सेवा देत असत.

नाशिक जिल्हा आयुर्वेद संमेलन आणि महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. तसेच अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या त्या अनेक वर्षे उपाध्यक्ष आणि संघटन प्रमुख होत्या. कामगार कल्याण मंडळ आणि शासकीय संस्थामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्याबरोबर आयुर्वेद प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts