सहकार भारती आयोजित कार्यकर्ता अभ्यास वर्गात संघटनात्मक बाबींबर सविस्तर चर्चा

सहकार भारती आयोजित कार्यकर्ता अभ्यास वर्गात संघटनात्मक बाबींबर सविस्तर चर्चा

सांगली – सहकार क्षेत्रात संस्कार रुजवण्यासाठी व हे क्षेत्र मजबूत करण्यासाठी जागरूक राहून कार्य करण्याचे आवाहन सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी केले. सहकारातून विकसित भारत यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.

कोल्हापूर विभाग सहकार भारतीच्या वतीने दोन दिवसीय कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. अभ्यास वर्गाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग सहसंघचालक भगतराम यांच्या हस्ते झाले. यावेळी आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांच्या अध्यक्षस्थानी होते.

सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचे फार मोठे स्थान आहे आणि ही अर्थव्यवस्था अधिक बळकट करायची असेल तर सहकारी संस्थांच्या माध्यमातून हे कार्य अधिक सुलभपणे होऊ शकते. त्यासाठी नवनवीन सहकारी संस्था स्थापन करण्यावर त्यांनी भर दिला.

सहकार भारती प्रदेश महामंत्री विवेक जुगादे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे, प्रदेश महिला प्रमुख वैशाली आवाडे, प्रदेश पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख सागर चौगुले, प्रदेश कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, प्रदेश सहसंघटन प्रमुख प्रवीण बुलाख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर उपस्थित होते.

अभ्यास वर्गात सहकार चळवळीशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांना संघटन, सहकारी मूल्ये, बँकिंग व्यवस्थापन, दूध डेअरी तसेच सामाजिक बांधिलकी या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा कार्यकारणी पदाधिकार्‍यांसह विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ उपस्थित होते. अभ्यास वर्गास सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमधील कार्यकर्ते उपस्थित होते. अभ्यास वर्गाच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुलप, सहप्रमुख जवाहर छाबडा, अभ्यास वर्ग प्रमुख सागर चौगुले यांनी परिश्रम घेतले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *