
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणे आणि नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत.
https://sahakarsugandha.org/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%af-2/
सर्व जिल्हा बँकांमध्ये यापुढे स्थानिकांसाठी ७० टक्के जागा
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणे आणि नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. उरलेल्या ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी असतील. पण जर जिह्याबाहेरील उमेदवार पुरेसे उपलब्ध नसतील तर त्या जागा स्थानिक उमेदवारांमधून भरण्याची मुभा सुद्धा शासनाने दिली आहे.
नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी होणार
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरती प्रक्रियेवर अनेकदा अपारदर्शकतेचे आणि पैशांच्या व्यवहाराचे प्रश्न उपस्थित केले जात होते. या तक्रारी लक्षात घेऊन राज्य शासनाने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने, पारदर्शी आणि नियमाप्रमाणे पार पडेल.