Author: admin

  • सहकारी बँकांनी सायबर सुरक्षतेबाबत सक्षम यंत्रणा करावी – आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा

    सहकारी बँकांनी सायबर सुरक्षतेबाबत सक्षम यंत्रणा करावी – आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा

    मुंबई – ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या विश्‍वासाला प्राधान्य देण्याबरोबर सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबत सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज Best place to buy cheap rolex daytona replica. And the best AAA+ swiss made grade 1 Rolex replica on our website with fast shipping. असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहकारी बँकाच्या विशेष संयुक्त बैठकीत सांगितले. निवडक सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. नूतन पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी नागरी सहकारी बँकेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

    नॅशनल अर्बन को-ऑप. फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक्स अँड क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद काळे तसेच सारस्वत को-ऑप. बँक अध्यक्ष गौतम ठाकुर, एसव्हीसी को-ऑप. बँक अध्यक्ष दुरेश चंद्रावकर, कॉसमॉस सहकारी बँक अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, टीजेएसबी बँक अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँक अध्यक्ष रविंद्र हेजीब, विशाखापट्टणम् को-ऑप. बँक अध्यक्ष राघवेंद्र राव, माणदेशी महिला सहकारी बँक अध्यक्षा चेतना सिन्हा, डोंबिवली नागरी सहकारी बँक अध्यक्ष गणेश धारगलकरे तसेच अन्य सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्‍वर राव आणि स्वामिनाथन जे आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते.

    गव्हर्नर मल्होत्रा यांनी आरबीआयच्या भूमिकेचा पुनरुच्चार करून सांगितले की, नागरी सहकारी बँकांनी ग्राहक सेवेच्या सर्व मानकांचे पालन करावे. तळागाळातील आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी सहकारी बँकांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. या क्षेत्रासमोरील नियामक आणि कार्यात्मक आव्हानाबाबत त्यांनी यावेळी सूचना देण्याचे आवाहन केले. तसेच ग्राहक सेवा आणि ठेवीदार यांच्या विश्‍वासाला टाडा जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

    यावेळी मेहता यांनी सांगितले की, आरबीआय आणि नागरी सहकारी बँक यांच्यातील चर्चा अतिशय सकारात्मक आणि यशस्वी झाली. नागरी सहकारी बँकांसमोरील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.

     

  • पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा – महामंत्री विवेक जुगादे

    पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा – महामंत्री विवेक जुगादे

    सहकार भारतीतर्फे सहकार प्रशिक्षण व स्नेहमेळावा यशस्वी

    चंद्रपूर –  सहकार हे सेवाक्षेत्र आहे.सहकाराची उंची वाढविण्यासाठी या क्षेत्रात प्रामाणिकपणा व समर्पित वृत्तीची गरज आहे. पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी Welcome to High Quality Replica Rolex Watches Sales on www.rolexreplicaswissmade.com, Buy the Best Replica Rolex Watches in the UK. स्पर्धेच्या मोहात न पडता विश्‍वस्ताच्या भूमिकेतून काम करावे, असे सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे सांगितले.

    प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेत सहकार भारती चंद्रपूर तर्फे आयोजित जिल्हास्तरीय सहकार प्रशिक्षण व स्नेहमीलन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव विनोद भीमनवार हे होते. ते म्हणाले, संस्काराशिवाय सहकाराचे पावित्र्य राखले जाऊ शकत नाही. त्यामुळे सहकार  क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षणातून संस्कारीत करण्याचे कार्य दीर्घकाळापासून सहकार भारती करीत आहे. सभासद व ग्राहकाप्रतीचा विश्‍वास निर्माण करण्यासाठी पतसंस्थांनी संस्कारीत होऊन प्रामाणिकपणे उत्तमोत्तम कार्य करावे.

    विभाग सहप्रमुख विजय गोटे, जेष्ठ मार्गदर्शक महेश मासुरकर, प्रतिकार संस्थेचे अध्यक्ष माणिकराव पाटेवार यांचीही समायोचित भाषणे झाली. जिल्ह्यातील पतसंस्स्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांचा प्रशिक्षणाचा वर्ग घेण्यात आला. डी. एन. काकडे  यांनी ‘पतसंस्था व्यवस्थापन व सक्तीची कर्जवसुली’ यावर तर स्वाती कुलकर्णी यांनी ‘सहकारी पतसंस्था व आयकर कायदा’ यावरील नियम व कायदे समजावून सांगितले. माजी सभापती चंदू मारगोनवार, जिल्हा महामंत्री पुष्पा गोटे, भाग्यश्री नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर महालक्ष्मे, राजेश कावलकर, प्रगती माढई यांच्यासह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

    प्रास्ताविक सहकार भारती जिल्हाध्यक्ष सतीश वासमवार यांनी तर सूत्र संचालन सुरज बोम्मावार आणि आभार किशोर आनंदवार यांनी मानले. जिल्ह्यातील दि महाराष्ट्र अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी, जयकिसान नागरी सहकारी पतसंस्था, प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्था, उत्कर्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, प्रवीणभाऊ नागरी सहकारी पतसंस्था, प्राथमिक शिक्षक पतपुरवठा सहकारी संस्था, जि.प.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, कल्पतरू बिगरशेती सहकारी पतसंस्था, कल्पवृक्ष महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, विदर्भ महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी, कांतीज्योती नागरी सहकारी पतसंस्था, श्री साई नागरी सहकारी पतसंस्था, संताजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, आनंद शालेय माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्था सहभागी झाल्या.