सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पंढरपूर – सहकार भारती पंढरपूर जिल्हा अध्यक्षपदी सीए राजेंद्र विलास बजाज यांची शिवानंद बोरामणी यांची महामंत्रीपदी तर अॅड. बिचुकले यांची संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे संघटक शरद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. सहकारी साखर कारखाना जिल्हा प्रकोष्ठपदी उमेश परिचारक यांची निवड करण्यात आली.
दीपप्रज्वलन व सहकार गीताने सुरुवात झाली. दुग्ध प्रकोष्ठप्रदेश प्रमुख उमेश विरधे यांनी स्वागत व परिचय करून दिला सहकार भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार व सहकार तपस्वी सुधाकरपंत परिचारक यांना अभिवादन करून सहकार भारती या संस्थेच्या वाटचालीचे अवलोकन केले.
संघटन प्रमुख जाधव यांनी सहकाराच्या वाढत्या भूमिका, केंद्रीय सहकार मंत्रालय तसेच ’मेक इन इंडिया’, ’स्टार्टअप इंडिया’ या उपक्रमांतील सहकार क्षेत्राचे योगदान विषद केले. विविध प्रशिक्षण उपक्रम व उद्योग संधींची माहिती देत सहकार चळवळीचे भविष्य भक्कम असल्याचे ते म्हणाले.
पांडुरंग साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, पंढरपूर बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, युवक नेते प्रणव परिचारक, करमाळ्याचे कन्हैयालाल देवी, सुरज रोंगे, सहकार भारतीचे गिरीश भवाळकर विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सहविभाग प्रमुख नाना वाघमोडे, सूत्रसंचालन विशाल तपकीरे आणि नियोजन गणेश हरिदास यांनी केले.
Leave a Reply