सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

नवी दिल्ली – सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्याची आवश्यकता असून सहकार क्षेत्र हे ग्रामीण भारताच्या विकासाचा मापदंड आहे, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे सहकार मंत्राल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मंथन बैठकीत ते अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कृष्णपाल गुर्जर, सचिव डॉ. आशिष कुमार आणि विविध राज्यातील सहकार मंत्री, तज्ञ उपस्थित होते. सहकारी संस्थांनी अधिक प्रभावीपणाने आणि पारदर्शीपणे काम करून शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणार्या सहकारी बँकांना विविध घटकांना कर्जाची उपलब्धता करण्यासाठी निधीची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील 31 सहकारी बँकापैकी 23 बँका सक्षमपणाने कार्यरत आहेत तर अन्य बँका अडचणीत आहेत. या बँकांना निधी उपलब्धा करून देण्याची गरज आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना आर्थिक पुरवठा सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे आणि आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. तसेच राज्यातील 21 हजार प्राथमिक कृषी सहकारी संस्था डिजिटल सक्षमीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. याबरोबर सहकार क्षेत्रातील अन्य घटकांच्या प्रगतीसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी नमूद केले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *