रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची शिक्षक सहकारी बँकेला भेट

रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची शिक्षक सहकारी बँकेला भेट

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शिक्षक सहकारी बँक या शेड्यूल्ड बँकेला सदिच्छा भेट दिली आणि बँकेच्या संचालकांशी संवाद साधत बँकेची माहिती घेतली. ज्येष्ठ संचालक तसेच संचालक अनिल मुळे, विवेक जुगादे, अ‍ॅड. विनायक राजकारणे, रंजीव श्रीरामवार व मुख्य कार्यकारी अधिकारी अल्पेशकुमार जोशी यांनी स्वागत केले.

संचालक व सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री जुगादे यांनी देशातील व महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती सांगितली. भारतीय रिझर्व बँकेच्या सध्याच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील बहुतांश नागरी सहकारी बँका या उत्तम कार्य करीत आहेत. शिक्षक सहकारी बँकेचा यंदाचा एकूण व्यवसाय 1950 कोटींच्यावर पोहोचला असून ढोबळ नफा 18.50  कोटी तर निव्वळ नफा 9.15 कोटींपेक्षा अधिक झाला असून नेट एनपीए शून्य टक्के आहे.

बँकेची सभासद संख्या सव्वा लाखांच्यावर असून ग्राहकांना बँक तत्पर सेवा प्रदान करीत आहे. बँकेचे अध्यक्ष अनिल सोले व उपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके तसेच सर्व संचालक मंडळांच्या सांघिक प्रयत्नातून बँकेने हे देदिप्यमान यश संपादन केले आहे. संघाचे महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे, इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर, रामचंद्र देवतारे, अशोक मेंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *