सहकार क्षेत्राला केंद्र सरकारचे मोठे पाठबळ – आयुक्त तावरे

0 Comments

सहकार क्षेत्राला केंद्र सरकारचे मोठे पाठबळ – आयुक्त तावरे

पुणे – सहकार विषयासंदर्भात यापूर्वी केंद्र शासनाशी संबंध येत नव्हता. सर्व अडी-अडचणींसंदर्भात राज्य शासनाशी संपर्कात असायचा. मात्र, सन 2018 पासून केंद्राशी संबंधात असून दररोज चांगले निर्णय होत आहेत. सहकार क्षेत्राला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ आहे. नवनवीन ठिकाणी नागरी सहकारी बँकांची स्थापना व्हावी, याकरिता केंद्र शासन प्रयत्नशील असून सहकार्य देखील करीत असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी व्यक्त केले. पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता- एक गेम चेंजर’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, संचालक निलेश ढमढेरे, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, मंगला भोजने, डॉ. प्रिया महिंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते.

परिषदेचे उद्घाटन सहकार व तंत्रज्ञानरूपी रोपाला पाणी घालून करण्यात आले. सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले नवनियुक्त आमदार हेमंत रासने, पुणे बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंझाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातील 350 बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये होता.

आयुक्त तावरे म्हणाले, सहकारी बँकांची क्षमता केवळ आकड्यांमध्ये न मोजता त्यांचे सोशल ऑडिट होणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे धोके पत्करून गरजूंना या बँका मदत करतात. यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य उभे रहात आहे. सहकारी बँकांची ही चांगली बाजू लोकांसमोर यायला हवी. आपण डिजिटल क्षेत्रात गेलो आहोत. सेवा आणि नोंदी या डिजिटल स्वरूपात द्यायला हव्या. एआयच्या माध्यमातून परदेशात अनेक ठिकाणी व्यवहार सुरु आहेत. त्याप्रमाणे आपणदेखील यातून पुढचे पाऊल टाकायला हवे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

संपादकीय…

सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरण - सतीश मराठे सांगली -…