सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरण - सतीश मराठे

जे. जी. पाटील मेमोरियल फौंडेशनतर्फे समाजभूषण पुरस्कार 2024 माण देशी फौन्डेशन व माण देशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांना प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे हस्ते व रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला.रोख 51 हजार रूपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सांगली अर्बन बँकेच्या स्व.म.ह तथा अण्णा गोडबोले सभागृह येथे हा सोहळा उत्साहात झाला. फौन्डेशन सचिव श्री.एच.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. आमदार सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, महाराणी देवी अहिल्याबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर.एस. चोपडे उपस्थित होते.
आमदार देशमुख यांनी समाजासाठी आदर्शवत कार्य करणार्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.सन्मानपत्र वाचन महेश कराडकर यांनी केले. डॉ. भवाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि, श्रीमती सिन्हा यांनी म्हसवड सारख्या ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचे जे कार्य केले आहे ते अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
सहकारी पतपेढ्या, बँका, विकास सोसायटी, दुध संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करणेसाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. श्रीमती सिन्हा यांनी केलल्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले व यापुढेही केंद्र सरकार मार्फत महिलांसाठी असलेले विविध उपक्रम खेड्यापर्यंत पोचवावेत असे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले.
श्रीमती चेतना सिन्हा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माण देशी फौन्डेशन व माण देशी महिला सहकारी बँकेतर्फे सुरु असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली. तसेच प्रतिकूल परिस्थितीत म्हसवड येथे काम कसे सुरु केले व माण देशी महिला सहकारी बँकेची स्थापना करताना कोणत्या अडचणी आल्या व त्यावर मात करून कशी मंजुरी मिळाली याची माहिती सांगितली. कृषी मंत्रालय येथे निवड झालेबद्दल डॉ. राजवर्धन किरण पाटील, लॉ परीक्षेत प्रथम क्रमाक मिळवणार्या सना सलीम मुजावर आणि मधुरा विजय पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. आभार मधुरा पाटील यांनी मानले.
Related Post
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने.....
- नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन
- देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार : सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी
- केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
- सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन
- सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान - सतीश मराठे
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह
- मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ....
Related Posts
सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आणखी जलद – मुख्यमंत्री फडणवीस
सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आणखी जलद - मुख्यमंत्री फडणवीस…
त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कार्यकारी मंडळावर सतीश मराठे
त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कार्यकारी मंडळावर सतीश मराठे नवी दिल्ली -…

नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळमुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन
नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित…