13 March, 2025
0 Comments
1 category
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (MSC Bank) यापुढे कुस्तीगिरांसाठी ५% जागा राखीव

मुंबई : राज्याची शिखर सहकारी बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने त्यांच्या सेवा नियमांमध्ये बदल करत राज्यस्तरीय मातीवरील व गादीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये विविध गटांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या विजेत्यांसाठी व ‘महाराष्ट्र केसरी’ अथवा ‘हिंद केसरी’ या पुरस्कारांनी गौरविलेल्या कुस्तीगिरांसाठी कर्मचारी भरतीमध्ये किमान ५% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय बँकेचे प्रशासक व ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी आज जाहीर केला आहे.
या धोरणास अनुसरून महाराष्ट्रामध्ये किमान १५ वर्षे वास्तव्यास असलेल्या तसेच राज्य बँकेच्या सेवा नियमांमधील सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या कुस्तीगिरांना राज्य बँकेच्या सेवेमध्ये ५% इतक्या जागा आरक्षित ठेवून त्यांना संधी देण्याचे धोरण राज्य बँकेने स्वीकारले आहे.
Coop #सहकार #MSCBank #Banking
Category: Blog