पुणे सहकारी बँकेवरील सर्व निर्बंध ‘आरबीआय’ने हटवले

पुणे सहकारी बँकेवर लावण्यात आलेले सर्वसमावेशक निर्बंध आरबीआयने [Reserve Bank Of India] हटविले आहेत. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार नियमितपणे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेच्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा, सहकार विभागाच्या सहायक निबंधक प्रगती वाबळे यांनी ही माहिती दिली.
पुणे सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाची रिझर्व्ह बँकेबरोबर नुकतीच बैठक झाली होती त्यामध्ये राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकेचे व्यवहार सुरळीत सुरु रहावेत यासाठी विशेष प्रयत्न केले .
२०२३ मध्ये पुणे सहकारी बँकेवर निर्बंध लावले गेले होते. त्यामुळे ठेवी स्वीकारण्यावर कर्ज व्यवहार करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. आता सर्व प्रकारच्या बँकिंग संबंधी कामकाजाला पुन्हा सुरुवात होत असल्याने बँकेची आर्थिक स्थिती सक्षम होईल, असा विश्वास प्रशासक मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थकबाकी वसुलीही वेगाने होत असल्याने बँकेची Net Worth वाढली असून, अन्य निकषांमध्येही बँकेची प्रगती चांगली आहे.
Leave a Reply