आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत एक विशेष चर्चासत्र संपन्न

इचलकरंजी – कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने अंब्रेला ऑर्गनायझेशन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, राज्य अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे व नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फेडरेशन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी हे उपस्थित होतेे.
सहकार क्षेत्रातील बदलत्या घडामोडी, नवनवीन शासकीय योजना, सहकारी बँकांच्या भविष्यातील वाटचाली संदर्भातील विषयांवर वैशाली आवाडे यांनी मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रातील शाश्वत आर्थिक विकास, कार्यक्षम सेवा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, अंब्रेला ऑर्गनायझेशनचे लाभ आणि पारदर्शक व्यवस्थापन या मुद्द्यांवर चर्चा झाली.
बँकेचे उपाध्यक्ष संजयकुमार अनिगोळ संचालक मंडळ, बँकेचे व्यवस्थापक दीपक पाटील किरण पाटील विविध बँकांचे पदाधिकारी संचालक कर्मचारी सहभागी झाले होते.