24 January, 2025
admin
0 Comments
1 category
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह

शिर्डी अधिवेशनासाठी मुंबई येथून स्व. धनंजयराव गाडगीळ आणि नागपूर येथून
सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या
दोन्ही दिंड्या शिर्डी येथे पोहोचल्या. या दिंड्यांमध्ये सहकार भारतीचे पदाधिकारी,
कार्यकर्ते तसेच त्या त्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते. विविध जिल्ह्यांमध्ये या सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत
करण्यात आले.
पुणे – सहकार क्षेत्राची सकारात्मक बाजू जनतेसमोर येणे गरजेचे आहे आणि त्याचा
प्रसार आणि प्रचार सर्वत्र होणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा राज्याचे सहकार आयुक्त
दीपक तावरे यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्य
सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार
दिंडीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. सहकारी पतसंस्थांचे प्रश्न मार्गी
लावण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालय सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे त्यांनी
नमूद केले.
पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विविध
जिल्ह्यातून काढण्यात आलेल्या सहकारी दिंड्या पुण्यात दाखल झाल्या.
त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. नागपुर,
वर्धा, यवतमाळ बुलढाणा, मुंबई, पुणे सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर येथून
दिंड्या येथे दाखल झाल्या येथून सर्व दिंड्या शिर्डीकडे मार्गस्थ झाल्या.
राज्याचे अतिरिक्त सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, सहकार निवडणूक प्राधिकरण
आयुक्त अनिल कवडे, जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, नागरी सहकारी
बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिरीष देशपांडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दि. 8 आणि 9 फेब्रुवारी या कालावधीत शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे
आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी विविध देशांतून सहकारी संस्थांचे
प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या
वतीने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यूनोच्या वतीने
सन 2025 हे आंतराष्ट्रीय वर्ष म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले असून त्या
निमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
दि. 8 रोजी विविध देशातील सहकारी संस्था प्रतिनिधी आणि राज्यातील सहकार
क्षेत्रात कार्यरत असणार्या निवडक युवक आणि महिला प्रतिनिधींची कार्यशाला
होणार आहे. तर दि. 9 रोजी राज्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींचा महामेळावा
आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत सहकार
क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
असे आवाहन करण्यात आले आहे.
Related Post
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने.....
- नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन
- देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार : सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी
- केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया
- सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन
- सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान - सतीश मराठे
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह
- मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ....
Category: Blog
Related Posts
सहकार भारती आयोजित बचत गट महोत्सव
सहकार भारती आयोजित बचत गट महोत्सव महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक व्यासपीठाला…
देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण…