Category: Blog

  • सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

    सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

    पंढरपूर – सहकार भारती पंढरपूर जिल्हा अध्यक्षपदी सीए राजेंद्र विलास बजाज यांची शिवानंद बोरामणी यांची महामंत्रीपदी तर अ‍ॅड. बिचुकले यांची संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे संघटक शरद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार भारती पंढरपूर जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. सहकारी साखर कारखाना जिल्हा प्रकोष्ठपदी उमेश परिचारक यांची निवड करण्यात आली.

    दीपप्रज्वलन व सहकार गीताने सुरुवात झाली. दुग्ध प्रकोष्ठप्रदेश प्रमुख उमेश विरधे यांनी स्वागत व परिचय करून दिला सहकार भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार व सहकार तपस्वी सुधाकरपंत परिचारक यांना अभिवादन करून सहकार भारती या संस्थेच्या वाटचालीचे अवलोकन केले.

    संघटन प्रमुख जाधव यांनी सहकाराच्या वाढत्या भूमिका, केंद्रीय सहकार मंत्रालय तसेच ’मेक इन इंडिया’, ’स्टार्टअप इंडिया’ या उपक्रमांतील सहकार क्षेत्राचे योगदान विषद केले. विविध प्रशिक्षण उपक्रम व उद्योग संधींची माहिती देत सहकार चळवळीचे भविष्य भक्कम असल्याचे ते म्हणाले.

    पांडुरंग साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, पंढरपूर बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, युवक नेते प्रणव परिचारक, करमाळ्याचे कन्हैयालाल देवी, सुरज रोंगे, सहकार भारतीचे गिरीश भवाळकर  विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सहविभाग प्रमुख नाना वाघमोडे, सूत्रसंचालन विशाल तपकीरे आणि  नियोजन गणेश हरिदास यांनी केले.

  • सहकार भारती सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर

    सहकार भारती सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर

    सांगली – सहकार भारती सांगली जिल्हा ग्रामीणच्या वतीने ढालगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक, संवाद मेळावा झाला. यावेळी जत कवठेमंकाळ आटपाडी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

    सहकार भारतीचे प्रदेश संघटक संजय परमने यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सुमंत महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सारिका मुळीक यांनी केले. स्वागत स्वराज्य फाउंडेशनचे प्रायोजक व स्वराज्य पतसंस्थेचे अध्यक्ष सहकार भारतीचे जिल्हा सदस्य अजित खराडे यांनी केले. गुलाब पुष्प वृक्षाला पाणी घालून व्यासपीठावरील उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहकार गीत सादर सहकार भारती जिल्हा ऑडिट प्रकोष्ठ प्रमुख दत्तात्रय स्वामी यांनी केले.

    बैठकीत जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नूतन बैठकीत प्रदेश संघटक परमणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, येणारा काळ उज्वल आहे. सहकारात धाडसी निर्णय घेतल्याशिवाय त्यांची प्रगती नाही, सहकार टिकला पाहिजे, रुजला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ठेवीदार हा संस्थेचा दुवा असून त्याचे ठेवीचे पैसे सुरक्षितता आपण सर्वांनी सांभाळली पाहिजे, असे मत व्यक्त केले. नरसोबाची वाडी या ठिकाणी सहकार भारतीतील कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्गाची माहिती दिली. प्रत्येक तालुक्यातील किमान पाच सदस्याने आपले नाव नोंदणी करावी व अपूर्ण राहिलेल्या तालुक्यातील कार्यकारणी तेथील पदाधिकार्‍यांनी या अभ्यास वर्गांपूर्वी पूर्ण करावी असे सांगितले.

    समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार भारतीच्या वतीने परमने यांचा शाल व देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकारणीच्या निवडीनंतर चंद्रकांत दौंडे विक्रम कोळेकर, प्रतिभा दबडे, विकास भुते यांनी मत व्यक्त केले. प्रकोष्ठ प्रमुख व आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सचिव दत्तात्रय स्वामी यांनी सहकार भारतीचे कार्य, कामकाज, प्रशिक्षण तर महामंत्री भारत निकम यांनी मार्गदर्शन केले. आभार सारिका मुळीक यांनी मानले.