Category: Blog

  • त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कार्यकारी मंडळावर सतीश मराठे

    त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कार्यकारी मंडळावर सतीश मराठे

    नवी दिल्ली – सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची नुकतीच गुजरातमधील त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षासाठी असणार आहे.

    केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त मंडळात एकूण 25 सदस्य असणार आहेत. त्यामध्ये 4 सदस्य नामनिर्देशित असणार आहेत. देशातील सहकार क्षेत्राच्या सर्व स्वरुपाच्या संस्थासाठी प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन पदवी, पदविका, अभ्यासक्रम असे अनेकविध उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

  • सहकार भारती नागपूर महानगर बैठकीत विविध विषयांवर चर्चा

    सहकार भारती नागपूर महानगर बैठकीत विविध विषयांवर चर्चा

    नागपूर – सहकार भारती नागपुर महानगराची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये विविध विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. महानगर अध्यक्ष घनशाम कुकरेजा अध्यक्षस्थानी होते. बैठकीला प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, महामंत्री किरण रोकडे, नीलिमा बावणे, सारिका पेंडसे, संजय रोकडे, मनोज पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या सहकार भारती प्रदेश कार्यकारिणी बैठकीची माहिती राहुल कोडमलवर यांनी सांगितली तर सहकार भारती ऑनलाइन सदस्यता अभियानाची माहिती पांडे यांनी सांगितली. संगीता ठाकरे यांनी सहकार भारती दक्षिण भागाची कार्यकारिणी जाहीर केली. बैठकीचे सूत्र संचालन रोकडे यांनी तर आभार कविता खापरे यांनी मानले.