Blog

  • जोगेश्‍वरी नागरिक सहकारी पतसंस्थेचा 52 वा वर्धापन दिन साजरा

    जोगेश्‍वरी नागरिक सहकारी पतसंस्थेचा 52 वा वर्धापन दिन साजरा

    मुंबई – जोगेश्‍वरी नागरिक सहकारी पतसंस्थेचा 52 वा वर्धापन दिन संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सभासद ठेवीदार यांना आर्थिक व्यवहाराची माहिती थेट मोबाईलवर मिळावी, यासाठी संस्थेने अधिकृत मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले.

    प्रमुख पाहुणे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व मालाड सहकारी बँकेस संचालक सीए भूषण पैठणकर यांच्या हस्ते ‘मोबाईल अ‍ॅप’चे लोकार्पण करण्यात आले.

    संस्थेचे अध्यक्ष संजय क्षिरसागर आणि संचालक ठेवीदार, सभासद, कर्मचारी वर्ग  तसेच सहकार सुगंधचे प्रतिनिधी गणेश खिलारे उपस्थित होते.