डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर

डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर

Rs.150.00

डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर सध्या कम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन ह्यांखेरीज कोणाचे पान हलेनासे झाले आहे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक आणि सरकारी पातळीवरही ई-उर्फ इलेक्ट्रॉनिक सुविधांवर जोर दिला जात असल्याने माहिती तंत्रज्ञानावर संपूर्ण कामकाज अवलंबून राहण्याचे दिवस आले आहेत. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. इंटरनेट हे एकमेकांना कनेक्ट केलेल्या सर्व संगणकांचे एक जागतिक नेटवर्क आहे. झटपट अर्थार्जन करण्यासाठी काही अनुभवी संगणक ऑपरेटर सायबर गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत. सायबर गुन्हेगार नवीन तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून गुन्हे करण्याच्या नवनवीन युक्त्या शोधतात. कुठलीही गोष्ट ही दोन बाजू घेऊनच येते. संगणक, मोबाइल व इतर आधुनिक उपकरणांचेपण असेच आहे. आपले आयुष्य, व्यवहार, उद्योग, व्यापार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित व लोकप्रिय झाले. पण त्याचबरोबर दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे; निर्माण होणारा ई-कचरा, सायबर गुन्हे, डिजिटल व्यसनाधीनता ह्याचा प्रसारही सर्व वापरकर्त्यांना कळला पाहिजे म्हणजे ते काळजी घेतील व सुरक्षित नि सावध वापर करतील. गरज आहे ती मानसिकता बदलायची. हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars