‘सहकार सुगंध’ हे सहकार भारतीचे भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) ने गौरविलेले मासिक असून सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय व आवश्यक घडामोडींचा मागोवा घेणारे तसेच सहकाराच्या वाढीसाठी पूरक असलेल्या बाबींना योग्य प्रसिद्धी देणारे पुण्याहून प्रसिद्ध होणारे मासिक आहे. सहकार क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, संस्था, शासनाचे विभाग, मंत्रालय अशा सर्व व महाराष्ट्रभरातील 25,000 हून अधिक वर्गणीदारांना दर महिन्याला पोस्टाने वितरीत होणारे प्रभावी प्रसिद्धी माध्यम आहे. सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्था, सहकारी संस्था, सहकारी कायदे, सहकारातील प्रगतिशील व्यक्ती-संस्था, कार्यक्रम, उपयुक्त उपक्रम, विशेष उल्लेखनीय बाबी यांची माहिती या अंकात असते. सहकारी बँकिंग, पतसंस्था, बचतगट यांबाबत विशेष माहिती, सहकारी संस्थांचे संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त माहिती व मार्गदर्शनासाठी ‘सहकार सुगंध’ वाचनीय, संग्राह्य आणि संदर्भसूचक आहे. 2011 पासून सहकार सुगंधच्या संपादकपदी श्री. भालचंद्र कुलकर्णी असून सहकार भारतीच्या राष्ट्रीय प्रकाशन प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी आहे.