replica watches

panerai replica

Breitling Replica

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात प्रथमच ‘उदंचन जलविद्युत प्रकल्प’

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यामध्ये तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते

‘देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था होणार’ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

देशातील ग्रामीण भागात परिवर्तन घडविण्यासाठी ‘सहकार से समृद्धी’ या आधारे देशाच्या विविध भागात सुमारे दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले.

रिझर्व बँक ऑफ इंडियाची शीघ्र सुधारकृती चौकट

नागरी सहकारी बँकांच्या नियंत्रणासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल 2025 पासून नवीन चौकट तयार केली आहे. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन फ्रेमवर्क या नावाची नवीन नियमावली तयार करण्यात आली असून नागरी सहकारी बँकांसाठी पूर्वी असलेली सुपरवायझरी अ‍ॅक्शन फ्रेमवर्कही आता रद्द करण्यात आलेले आहे.

 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा पीजीडीएम अभ्यासक्रम सुरू

– भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने प्रोत्साहित केलेल्या तसेच राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेअंतर्गत कार्यरत असणार्‍या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था या संस्थेने नवीन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता असलेल्या दोन वर्षांच्या पीजीडीएम अभ्यासक्रमाची सुरुवात झाली.

‘महाराष्ट्र सहकारी मुद्रणालया’चे शिल्पकार : नरूभाऊ लिमये

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, सहकार नेते स्व. नरुभाऊ लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय’ ही संस्था स्थापन झाली. ही संस्था राज्यात मुद्रण क्षेत्रात एक अव्वल दर्जाची संस्था म्हणून काम करीत आहे. या संस्थेस नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने विशेष लेख…..

आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत एक विशेष चर्चासत्र संपन्न

– कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने अंब्रेला ऑर्गनायझेशन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

 

पतसंस्थेमधील गुंतवणुकीवरील परतावा आयकर मुक्त -सहकार आयुक्त तावरे

रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने काढलेल्या कर्ज रोख्यांमध्ये सहकारी पतसंस्थांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ही गुंतवणूक वैधानिक तरलतेच्या निकषांत बसणारी असून त्यावर मिळणारा परतावा आयकर मुक्त असल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.

 

सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

सध्याच्या सहकार कायद्यात बदलत्या कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता असून यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर केले आहे.

 

विकास सहकारी सोसायट्या सक्षम करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु

देशभरातील विकास सहकारी सोसायटी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा दृश्य परिणाम आता दिसू लागला आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील जवळपास 10,914 विकास सोसायटीकडून याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कार्यकारी मंडळावर सतीश मराठे

सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची नुकतीच गुजरातमधील त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षासाठी असणार आहे.

सहकार भारती नागपूर महानगर बैठकीत विविध विषयांवर चर्चा

सहकार भारती नागपुर महानगराची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये विविध विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. 

 

सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आणखी जलद - मुख्यमंत्री फडणवीस

सन 2022-23 मध्ये सहकार भारती आणि गृहनिर्माण प्रकोष्ठ, पतसंस्था प्रकोष्ठ यांच्या माध्यमातून तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना अनेक मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्यापैकी अर्धन्यायिक निर्णय प्रकिया, कन्व्हेयन्स प्रक्रिया, नोंदणी इ. ऑनलाइन पद्धतीने व्हावे ही मागणी केली होती. सहकार भारतीच्या या मागणीस यश आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन केले.

 

महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक व्यासपीठाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या अनेकविध वस्तूंचा दोन दिवसीय महोत्सव सहकार भारतीच्या वतीने प्रथमच पुण्यनगरीत आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यातून या महोत्सवात बचत गट सहभागी झाले होते. यापुढील काळातही हा उपक्रम दरवर्षी हाती घेण्यात येणार आहे.

 

बचतगट : आत्मनिर्भर स्त्रीशक्तीची ओळख!

आपल्या ग्रामीण आणि निमशहरी भारतात जेथे आर्थिक अपुर्‍या संधी, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक बंधने अजूनही महिलांसमोर अडचण म्हणून उभी राहतात, तेथे एक शांत पण ठाम क्रांती घडत आहे. ती म्हणजे महिला स्वयंसहायता बचतगटांची चळवळ.

दूध व्यवसायाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय अधिवेशनात व्यापक चर्चा

सहकार भारती डेअरी प्रकोष्ट आयोजित

दूध व्यवसायाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय अधिवेशनात व्यापक चर्चा

सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी तीन नवीन बहु-राज्य सहकारी समित्या होणार

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली येथे सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रात सस्टेनेबिलिटी (शाश्‍वतता) आणि सर्क्युलॅरिटी (चक्रीयता) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याविषयीचे सचित्र वृत्त…

सहकारी बँकांनी सायबर सुरक्षतेबाबत सक्षम यंत्रणा करावी - आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा

ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या विश्‍वासाला प्राधान्य देण्याबरोबर सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबत सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहकारी बँकाच्या विशेष संयुक्त बैठकीत सांगितले.

पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा - महामंत्री विवेक जुगादे

सहकार हे सेवाक्षेत्र आहे.सहकाराची उंची वाढविण्यासाठी या क्षेत्रात प्रामाणिकपणा व समर्पित वृत्तीची गरज आहे. पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी स्पर्धेच्या मोहात न पडता विश्‍वस्ताच्या भूमिकेतून काम करावे, असे सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे सांगितले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास सोप्या पद्धतीने व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडले. याबाबतचे सचित्र वृत्त…

देशाचा जीडीपीचा दर वाढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता : आरबीआय संचालक सतीश मराठे यांची अपेक्षा

सहकार भारती संस्थापक सदस्य आणि आरबीआय संचालक सतीश मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्याविषयीचे सचित्र वृत्त…..

त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या निमित्ताने...

सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने गुजरातमधील आणंद येथे ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठ’ स्थापन करण्याच्या विधेयकाला नुकतीच राज्य सभेने मंजुरी दिली आहे आणि यावर राष्ट्रपतींची सही होऊन लवकरच या विद्यापीठाची पायाभरणी केली जाणार आहे. केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून सहकार चळवळीसाठी अनेकविध चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यापैकीच ही एक!

सहकाराच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूतोवाच

देशामध्ये सहकार क्षेत्राचा अजून मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी जागतिक स्तरावरील संस्थांच्या बरोबर भागीदारी करण्याची आवश्यकता आहे.

देशाच्या आर्थिक भविष्याला आकार व स्थिरता आणण्यात आरबीआयची भूमिका महत्त्वपूर्ण - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई – देशाच्या आर्थिक भविष्याला आकार देण्यात आणि स्थिरता येण्यामध्ये आरबीआयची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे बोलताना सांगितले.

अंत्योदय संकल्पना प्रत्यक्षात येईल का?

मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा आढावा घेतल्यावर असे लक्षात येते की, मानवाच्या जगण्याच्या संदर्भात संघर्ष करण्यासाठी अतिप्राचीन काळापासून माणसाने या ना त्या स्वरूपात सहकाराचा आधार घेतलेला दिसून येतो. सहकार ही समाजाने समाजासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे.

पतसंस्थांनी वाढीचा ध्यास धरावा, पण वाढ सातत्यपूर्ण, प्रमाणबद्ध असावी

पतसंस्थाचा आकार, अर्थकारण, सभासद संख्या द्रुतगतीने वाढते आहे. महाराष्ट्रातील काही संस्था ही 10 हजार कोटींचा ठेव टप्पा पार करण्यात यशस्वी झाल्या तर काही संस्था हा टप्पा पार करण्याकडे वाटचाल करताना दिसतात.

सहकार क्षेत्राला केंद्र सरकारचे मोठे पाठबळ - आयुक्त तावरे

पुणे – सहकार विषयासंदर्भात यापूर्वी केंद्र शासनाशी संबंध येत नव्हता. सर्व अडी-अडचणींसंदर्भात राज्य शासनाशी संपर्कात असायचा. मात्र, सन 2018 पासून केंद्राशी संबंधात असून दररोज चांगले निर्णय होत आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (MSC Bank) यापुढे कुस्तीगिरांसाठी ५% जागा राखीव

मुंबई : राज्याची शिखर सहकारी बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने त्यांच्या सेवा नियमांमध्ये बदल करत राज्यस्तरीय

नागरी सहकारी बँकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेवर रिझर्व बँकेने नुकतीच बंधने घातली आहेत. या बँकेबद्दल वृत्तपत्रात आणि समाज माध्यमांवर ज्या बातम्या आलेल्या आहेत, त्यावरून बँकिंगबाबतचे सर्वसामान्य नियम पाळले गेले नाहीत, असे दुर्दैवाने दिसते.

सहकारी बँकांकडे पाहण्याचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक - सतीश मराठे

सहकारी बँकांच्या माध्यमांतून समाजाच्या तळागाळातील लोक बँकिंग क्षेत्राशी जोडले जातात. कोरोनानंतरच्या काळात सहकारी बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झालेला आहे

महिलांसाठीच्या विविध योजना

सर्व स्त्रीवर्गाला माझा नमस्कार आणि महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!! मार्च महिना येतो तोच आनंदाची लहर घेऊनी येतो. आपला विशेष अधिकाराचा दिवस महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करायचा असतो.

आजच्या काळातही महिला विकासात्मक कामात अग्रेसर

महिला आजच्या युगामध्ये कोठेही कमी नाहीत. जुन्या नव्या युगातील सर्व क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केलेली आहे. अनेकविध संस्थांवर महिला काम करीत आहे.

सहकाराचे शिक्षण देणारे विद्यापीठ लवकरच होणार - सहकार राज्यमंत्री मोहोळ

पुणे – सहकार विषयक शिक्षण देणारे आणि अभ्यास करणारे विद्यापीठ सरकारच्या वतीने नजीकच्या काळात उभारण्यात येणार असून याबाबतचे विधेयक संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात आले आहे.

मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ....

सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, भारतीय रिझर्व बँकेचे संचालक व असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत मा श्री सतीशजी मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुंबई (दादर) येथील श्री स्वामीनारायण सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने.....

संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेआहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणून अर्थव्यवस्था आणि मानवी विकासासाठी सहकार क्षेत्राचे …..

नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन

मुंबई – आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी शिस्त आणि शुचिता आणि संस्थांना समृद्ध करणे यावर अधिक भर देण्यात येणार आहे…..

देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार :सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी

आगामी काळात देशाच्या विविध राज्यांत सहकार भारतीच्या कार्याचा विस्तार करण्या बरोबर नजीकच्या काळात नव्याने उभ्या राहणार्‍या सहकारी संस्थांसाठी…..

केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया : अर्थसंकल्पातील सहकार क्षेत्राच्या तरतुदींबद्दल संमिश्र प्रतिक्रिया

विकास संस्था व सहकार खात्याच्या संगणकीकरणावर भर – केंद्र सरकारच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकास…..

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन

नाशिक – सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा तसेच नाशिक जिल्हा रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सलग 20 वर्षे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांचे नुकतेच निधन झाले…..

सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान - सतीश मराठे

नाशिक – सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत कार्यरत असणार्‍या आणि समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी काम करणार्‍या डॉ.
शशिताई अहिरे…..

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह

शिर्डी अधिवेशनासाठी मुंबई येथून स्व. धनंजयराव गाडगीळ आणि नागपूर येथून
सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते…..

सहकारी बँकांनी सायबर सुरक्षतेबाबत सक्षम यंत्रणा करावी - आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा

ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या विश्‍वासाला प्राधान्य देण्याबरोबर सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबत सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहकारी बँकाच्या विशेष संयुक्त बैठकीत सांगितले.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात प्रथमच ‘उदंचन जलविद्युत प्रकल्प’

‘देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था होणार’ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

रिझर्व बँक ऑफ इंडियाची शीघ्र सुधारकृती चौकट

‘सहकार सुगंध’ हे सहकार भारतीचे मासिक असून सहकार क्षेत्रातील घडामोडी, बँका, पतसंस्था, सहकारी संस्था, कायदे व उपयुक्त माहिती यांचा आढावा घेणारे प्रसिद्ध माध्यम आहे. महाराष्ट्रातील 25,000+ वर्गणीदारांना दर महिन्याला वितरीत होणारे हे मासिक वाचनीय, संग्राह्य आणि मार्गदर्शनासाठी उपयुक्त आहे.

Social Links